केर हेल्थ इन्शुरन्स (पूर्वीचे रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ) हा रेलिगेअर ग्रुपचा भाग आहे. रेलिगेअर एंटरप्रायझेस लिमिटेड (आरईएल)ची थेट उपकंपनी आहे. केदारा कॅपिटल ही कंपनीची सह-प्रवर्तक आहे. केर हेल्थ इन्शुरन्स ही जुलै २०१२ मध्ये स्थापन झालेली भारतीय आरोग्य विमा कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय गुडगाव, हरयाणा येथे आहे. याची १५८ कार्यालये भारतात आहेत. यात ६००० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. हे सध्या आरोग्य विमा, गंभीर आजार विमा, वैयक्तिक अपघात विमा, सुपर टॉप-अप कव्हरेज, आंतरराष्ट्रीय प्रवास विमा आणि मातृत्व सोबत ग्रुप हेल्थ इन्शुरन्स आणि कॉर्पोरेट्ससाठी ग्रुप वैयक्तिक अपघात विमा यासाठी किरकोळ विभागातील उत्पादने ऑफर करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केअर हेल्थ इन्शुरन्स
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.