कॅसोवेरी किंवा कॅसोवरी (तोक पिसिन: मुरुक, इंडोनेशियन :कासुआरी) हे कॅजुअरायफॉर्मस या गणातले कॅजुएरियस वंशातले उड्डाणहीन पक्षी आहेत. ते उड्डाणहीन पक्षी (रॅटाइट/ratites) म्हणून वर्गीकृत आहेत: उरोस्थीच्या हाडांवर वळण नसलेले आणि न उडणारे पक्षी. कॅसोवेरी न्यू गिनी ( पापुआ न्यू गिनी आणि पश्चिम पापुआ ), आरु बेटे (मालुकू) आणि ईशान्य ऑस्ट्रेलिया या प्रदेशांच्या उष्णकटिबंधीय जंगलातील मूळनिवासी आहेत.
कॅसोवेरीच्या तीन जाती अस्तित्वात आहेत. सर्वाधिक आढळणारा, दक्षिणी कॅसोवेरी, हा जगात अस्तित्वात असलेला तिसरा सगळ्यात उंच आणि दुसरा सर्वात जड पक्षी आहे, जो शहामृग आणि इमूपेक्षा लहान आहे. इतर दोन प्रजाती उत्तर कॅसोवेरी आणि बटू कॅसोवेरी या आहेत; उत्तर कॅसोवेरी सर्वात अलीकडे आढळलेली आणि सर्वात धोक्यात असलेली जात आहे. चौथी प्रजाती ठेंगू कॅसोवेरी ही नामशेष झालेली प्रजाती आहे.
कॅसोवेरीच्या आहारात सुमारे ९०% फळांचा समावेश असतो, पण सर्व जाती संधिसाधू सर्वभक्षक असतात आणि बुरशी, अपृष्ठवंशीय प्राणी, अंडी, मुरदाड मांस, मासे आणि लहान पृष्ठवंशीय प्राणी जसे की कुरतडणारे प्राणी,लहान पक्षी, बेडूक, सरडे आणि साप . त्याचबरोबर अंकुर आणि गवताच्या बिया व इतर वनस्पती खातात. जरी सर्व उड्डाणहीन पक्षी(रॅटाइट/Ratites) मांस खाऊ शकतात, तरी कॅसोवेरी, व्याख्येनुसार, सर्वात जास्त प्रमाणात सर्वभक्षक आहेत आणि म्हणूनच, हा सर्वात मोठा सर्वभक्षक पक्षी आहे ज्याच्या आहारात मांस एक छोटा भाग आहे. आणि खरोखरच, शिकारी पक्ष्यांसारखे अतिमांसाहारी भक्षक नसताना, अगदी अल्पवयीन कॅसोवेरीसुद्धा निवडक अन्न खाणारे नसतात आणि त्यांच्या तोंडात बसेल ते काहीही खायला तयार असतात. त्यांच्या प्रथिनांच्या सेवनामध्ये सर्वात वैविध्यपूर्ण आहार देखील आहे, इतर उड्डाणहीन पक्षी (रॅटाइट/Ratites) जसे की शहामृग, इत्यादींच्या उलट कॅसोवेरींद्वारे मांस हे कठोर काळात मोठ्या प्रमाणात पर्याय म्हणून वापरले जाते आणि ते केवळ अपृष्ठवंशीय आणि लहान प्राण्यांपुरते मर्यादित असते. कॅसोवेरी माणसांपासून खूप सावध असतात, परंतु चिथावणी दिल्यास, ते कुत्रे आणि लोक दोघांनाही गंभीर, अगदी प्राणघातक जखमा करण्यास तयार असतात. कॅसोवेरीला अनेकदा "जगातील सर्वात धोकादायक पक्षी" असे म्हणले गेले आहे, तरी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिकेत वर्षाला दोन ते तीन माणसांचा बळी घेणाऱ्या सामान्य शहामृगाच्या तुलनेत तो कमी धोकादायक आहे.
कॅसोवेरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!