अजय नागर जे की कॅरीमिनाटी म्हणून ओळखले जातात, ते एक भारतीय यूट्यूबर असून भारतातील फरीदाबाद येथील राहणारे आहेत. ते त्याच्या विनोदी स्किट्स आणि त्यांच्या कॅरीमिनाटी चॅनलवरील विविध ऑनलाइन विषयांवरील प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात. अजय नगर हे भारतातील पहिले यूट्यूबर बनले आहे ज्यांचे यूट्यूब वर वैयक्तिक २९ दशलक्ष सदस्य आहेत. जे भारताच्या फरीदाबादमधील आहेत. अजयचे स्वतःचे यूट्यूब वर कॅरीमिनाटी आणि कॅरीइस्लाइव्ह नावाचे चॅनेल्स आहेत.
मे २०२० मध्ये त्याचा युट्यूब वि टिकटोक - द एन्ड नावाचा व्हीडिओ त्वरित यूट्यूब इंडियावर सर्वाधिक पसंत (संगीत-नसलेला) व्हीडिओ बनला. तथापि, सायबर छळ, आणि अपमानास्पद भाषेचा वापर यासारख्या कारणांना सांगून यूट्यूबने रेकॉर्ड ब्रेकिंग व्हीडिओ काढले.
कॅरीमिनाटी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?