कॅपिटल वन अरीना हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डीसी मधील एक बंदिस्त रिंगण (इनडोर अरीना) आहे. पेन क्वार्टर परिसरातील चायनाटाउन विभागात असलेले हे रिंगण वॉशिंग्टन मेट्रोच्या गॅलरी प्लेस स्थानकावर आहे. याचे उद्घाटन २ डिसेंबर १९९७ रोजी एमसीआय सेंटर म्हणून झाले. २००६ मध्ये व्हेरायझन कम्युनिकेशन्सने एमसीआय विकत घेतल्यावर त्याचे नाव व्हेरायझन सेंटर असे ठेवण्यात आले. २०१७ मध्ये कॅपिटल वन बँकेने नामकरण अधिकार खरेदी करून याचे कॅपिटल वन अरीना असे पुनर्नामकरण केले.
या रिंगणाची मालकी मोन्युमेंटल स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटकडे असून हे नॅशनल हॉकी लीगच्या वॉशिंग्टन कॅपिटल्स, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वॉशिंग्टन विझार्ड्स आणि जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी पुरुष बास्केटबॉल संघाचे घरचे मैदान आहे. १९९८ ते २०१८ पर्यंत ते विमेन्स नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वॉशिंग्टन मिस्टिक्सचेही घरचे मैदान होते होते.
या रिंगणाच्या विकासामुळे आजूबाजूच्या परिसराचे रूप बदलले आहे. हे रिंगण बांधल्यानंतर पूर्वी येथे असलेली चिनी-अमेरिकन लोकांची वस्ती ३,०००ची ३०० झाली आहे. या परिसराचे सौम्यीकरण किंवा प्रमाणीकरण झाल्याने आशियाई-अमेरिकन समुदायाला सेवा देणाऱ्या बहुतेक लहान व्यवसाय आणि रेस्टॉरंट्सची जागा राष्ट्रीय साखळ्यांनी घेतली आहे.
कॅपिटल वन अरीना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.