कॅनरी द्वीपसमूह (स्पॅनिश: Islas Canarias) हा अटलांटिक महासागरामधील एक द्वीपसमूह व स्पेन देशाचा स्वायत्त संघ आहे. कॅनरी द्वीपसमूह उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को व पश्चिम सहारा देशांच्या १०० किमी पश्चिमेस स्थित असून तो एकूण ७ बेटांचा बनला आहे. पोर्तुगालच्या असोरेस व मादेईरा सोबत कॅनरी द्वीपसमूह युरोपियन संघामधील सदस्य देशांच्या सर्वात बाह्य प्रदेशांपैकी एक आहे.
तेनेरीफ हे येथील सर्वांत मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट असून फ्वेर्तेबेंतुरा, ग्रान कनेरिया, लांथारोते, ला पामा, ला गोमेरा व एल हियेरो ही इतर बेटे आहेत. कॅनरी द्वीपसमूहावरील सौम्य व आल्हादकारक हवामान तसेच निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय असून दरवर्षी सुमारे १.२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.
कॅनरी द्वीपसमूह
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?