प्रा. कृष्णनाथ शर्मा (१ मे, इ.स. १९३४:काशी, उत्तर प्रदेश, भारत - ६ सप्टेंबर, इ.स. २०१५:जे.कृष्ण फाउंडेशन परिसर, बंगळूर, कर्नाटक, भारत) हे एक समाजवादी विचारवंत, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ होते. १९६१ मध्ये ते काशी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९९४ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
डॉ. आचार्य नरेंद्रदेव यांच्या प्रभावाने कृष्णनाथ हे १९५० साली समाजवादी आंदोलनात सामील झाले. डॉ. राममनोहर लोहिया यांचे ते एक सक्रिय सहयोगी होते. १९५६ मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी राजनारायण यांच्याबरोबर तुरुंगवास पत्करला होता. असेच सत्याग्रह व आंदोलने केल्याबद्दल त्यांना आयुष्यात एकूण सुमारे १३ वेळा तुरुंगात जावे लागले होते.
कृष्णनाथ शर्मा
थोडक्यात पण महत्त्वाचे.