कुशल पंजाबी (२३ एप्रिल १९७७ - २६ डिसेंबर २०१९) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता होता. त्याने फेब्रुवारी २०११ मध्ये अमेरिकन गेम शो वाइपआउटची भारतीय आवृत्ती असलेला टीव्ही रिॲलिटी गेम शो झोर का झटका: टोटल वाइपआउट जिंकला आणि 50 लाख (US$१,११,०००) बक्षीस जिंकले.
पंजाबी फरहान अख्तरचा लक्ष्य, करण जोहरचा काल, यूटीव्हीचा धन धना धन गोल, यासारख्या चित्रपटांमध्ये होता. तो कलर्स टीव्हीवरील इश्क मे मरजावां व अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील दिसला होता. याशिवाय, त्याने फियर फॅक्टर, मिस्टर अँड मिस टीव्ही, पैसा भारी पडेगा, नौटिका नेव्हिगेटर्स चॅलेंज, एक से बधकर एक, आणि झलक दिखला जा यासह अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.
२६ डिसेंबर २०१९ रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी पंजाबी मृतावस्थेत आढळले. मृत्यूचे कारण गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तो नैराश्याने ग्रस्त होता. आत्महत्या करण्यापूर्वी, त्यांनी लिहील्याप्रमाणे त्यांची मालमत्ता त्यांच्या पालकांमध्ये आणि मुलामध्ये वाटून दिली. सह-अभिनेता चेतन हंसराज यांच्या शब्दात, "ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे होत होते आणि आजाराने ग्रस्त होते".
कुशल पंजाबी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.