किकू शारदा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

किकू शारदा

किकू शारदा (जन्म राघवेंद्र शारदा म्हणून; १४ फेब्रुवारी १९७५) हा एक भारतीय विनोदकार तसेच चित्रपट व दूरदर्शन अभिनेता आहे. त्याचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला. किकूने आपले शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले जेथे त्याने मार्केटिंगमधील एमबीए पदवीसह पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.

किकूने हातिम मालिकेमध्ये होबो, F.I.R. मालिकेत कॉन्स्टेबल मुलायम सिंग गुलगुले आणि कॉमेडी शो अकबर बिरबलमध्ये अकबरची भूमिका साकारली होती. त्याने कॉमेडी नाइट्स विथ कपिल मध्ये काम केले होते जेथे त्याने विविध पात्रे साकारली होती, विशेषतः पलकची. त्याने प्रियांकाशी लग्न केले आहे. त्याने २०१३ मध्ये नच बलिये ६ आणि २०१४ मध्ये झलक दिखला जा ७ मध्ये भाग घेतला होता. तो अखेरचा सोनी टीव्हीवरील कपिल शर्मा शोमध्ये संतोष, बंपर आणि बच्चा यादव या प्रसिद्ध व्यक्तिरेखेसह विविध भूमिका साकारताना दिसला होता. तो बच्चा यादवचा भाऊ, अच्चा यादव जो परदेशात परतला आहे, त्याचीही भूमिका करत आहे.

२०१६ मध्ये किकू शारदाला एका दूरचित्रवाणी चॅनलवर डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग इन्सानची नक्कल केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. यामध्ये किकूला बाबा म्हणून मद्यपान करताना आणि मुलींसोबत अश्लील नृत्य करताना दाखवण्यात आले होते ज्यामुळे पंथ प्रमुखाचा अपमान झाल्याचा दावा करण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →