काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

साष्टीची बखर आणि महिकावतीची बखर यात तत्कालीन ठाणे जिल्हा म्हणजे सध्याची मुंबईच्या उपनगरांची वर्णने आहेत. एकोणिसाव्या शतकापासून आधुनिक मुंबईचे उल्लेख मराठी साहित्यात सापडतात. अरुण टिकेकरांचे यावर एक पुस्तक आहे. एकोणिसाव्या शतकात मुंबईची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने चौफेर वाढ झाली. त्याचे आलेख सर्वच क्षेत्रांतील साहित्यात उमटले आहेत. जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड, वि.ना. मंडलिक यांची चरित्रे, न.र. फाटक यांचा मुंबईचा इतिहास यांशिवाय कविता, कादंबऱ्या, लघुलेख यातूनही ते उमटते. ना.सी. फडके यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या, अनंत काणेकरांचे लेख, ह.ना. आपटे यांचे पण लक्षात कोण घेतो किंवा रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील आठवणी मध्येही मुंबई येते. भाऊ पाध्ये, मधु मंगेश कर्णिक, अनंत सामंत, [[श्री.ना.]पेंडसे]], अशोक शहाणे यांनी मुंबईवर आणि मुंबईच्या पार्श्वभूमीवर लिहिले आहे.

मुंबई दिनांक ही अरुण साधूंची मुंबईवर असलेली राजकारणाच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी. शिवाय सुकेतू मेहता यांनी लिहिलेलं Maximum City ही आहे. अरुण साधूंचीच झिपऱ्या, भाऊ पाध्यांची वासूनाका, याही मुंबईची पार्श्वभूमी असलेल्या काही कादंबऱ्या आहेत.

जयंत पवारांचे अधांतर हे नाटक गिरणीकामगारांच्या संपाने झालेल्या वाताहतीवर आहे. जयंत पवारांचाच 'फीनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा कथासंग्रह म्हणजे १९७० ते ९० या काळातील मुंबईच्या आत्मचरित्राचा पट मांडतो. नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे ह्यांची एक वेगळीच मुंबई. ललित मासिकाच्या एका बऱ्याच जुन्या दिवाळी अंकात श्री.ना. पेंडसे यांचा एक लेख होता. शिवाय गंगाधर गाडगीळ यांचे एक पुस्तक आहे.

भाऊ पाध्ये यांनी राडा वगैरे कादंबरीत मुंबई दाखवली आहे.

तसेच त्‍यांच्‍या वैतागवाडी या कादंबरीतही मुंबईतल्‍या मध्‍़यमवर्गीय लोकांच्‍या समस्‍यांवर भाष्‍य केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →