कालानमक तांदूळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कालानमक तांदूळ

कलानमक हा नेपाळ आणि भारतात लागवड केला जाणारा एक सुगंधित तांदूळ आहे. या तांदळाचा भुसा काळ्या रंगाचा असल्याने याचे नाव कालानमक चावल असे पडले आहे. बौद्ध काळापासून (600 ईसापूर्व) या जातीची लागवड केली जात आहे. हे नेपाळच्या हिमालयी तराईमध्ये म्हणजे कपिलवस्तु आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेश मध्ये हा सुगंधित काळा मोती चावल म्हणून ओळखले जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्पेशॅलिटी राईस ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात हे वैशिष्ट्यीकृत करण्यात आले आहे.

या वाणाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने घट झाली असून, हे वाण पुढील काही कारणाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे:



१९९८ आणि १९९९ मध्ये पॅनिकल ब्लास्ट महामारी.

पिकाच्या जास्त उंचीमुळे पीक लवंडते.

दीर्घकालावधी चे पीक. (६ ते ७ महिने)

निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि संशोधनाचा अभाव.

सिद्धार्थ नगर, संत कबीर नगर, महाराजगंज, बस्ती, गोंडा आणि गोरखपूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कपिलवस्तु आणि यूपीच्या तराई पट्ट्यात कालानमक चे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. इ.स. १९९० पर्यंत, सिद्धार्थनगरमधील एकूण भात लागवडी च्या क्षेत्रफळाच्या १०% पेक्षा जास्त प्रांतात या जातीचा समावेश होता. तथापि, २००२ मध्ये या जिल्ह्यात या जातीचे एकरी क्षेत्र एकूण भात लागवडीच्या 0.5% पेक्षा कमी पर्यंत घसरले.



कालानमक तांदळाची लागवड बौद्ध काळापासून (600 ईसापूर्व) केली जात आहे. कपिलवस्तुच्या उत्खननात कालानमकच्या साळी आणि दाणे सापडले. अलिगढवाच्या उत्खननादरम्यान कालानमकसारखे कार्बनयुक्त तांदळाचे धान्य सापडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →