काल्पोंग नदी ही अंदमान आणि निकोबार बेटांमधील उत्तर अंदमान बेटांमधील एक नदी आहे. ती सॅडल पीकपासून उगम पावते, जो अंदमान मधील सर्वात उंच शिखर आहे. काल्पोंग नदी उत्तरेकडे सुमारे ३५ किलोमीटर लांब वाहते आणि दिगलीपूरजवळ पूर्व किनाऱ्यावरील एरियल बे क्रीकमध्ये सामील होते. ५.२५ मेगावॅट क्षमतेचा काल्पोंग जलविद्युत प्रकल्प, हा उत्तर अंदमानमधील पहिला जलविद्युत प्रकल्प नदीवर कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पातून दरवर्षी १४.८३ दशलक्ष युनिट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कालपोंग नदी
यामागील विज्ञान आणि इतिहास.