कामदेव (संस्कृत: कामदेव, IAST: Kāmadeva), काम, मन्मथ आणि मदन म्हणूनही ओळखले जाते.हा हिंदू धर्मातील 'प्रेम व कामाची' देवता आहे. कामदेवाची पत्नी रति आहे. हरिवंश पुराण महाभारतानुसार कामदेव आणि रति यांना हर्ष व यश अशी दोन मुले आहेत.भागवत पुराणानुसार,कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे.;वैष्णव सिद्धांतानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात. हिंदू शास्त्रात कामाची देवता मानली जाते. कामदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला नळगीर येथे झाला असे मानले जाते. कामदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. कामदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. त्यांचे अन्य नावे रागवृंत, अनंग, कंदर्प, मन्मथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव इत्यादी प्रसिद्ध आहेत.
पुराणांमध्ये, कामदेवाचा उल्लेख सामान्यतः सृष्टिकर्ता देव ब्रह्माचा मानसपुत्र (मनातून जन्मलेला पुत्र) म्हणून केला जातो. त्याची सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे देव शिवाच्या तिसऱ्या डोळ्याने त्याचे भस्मीकरण होणे आणि कृष्ण व त्याची मुख्य पत्नी रुक्मिणी यांचा ज्येष्ठ पुत्र प्रद्युम्न म्हणून पृथ्वीवर त्याचा पुनर्जन्म होणे.
कामदेव
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.