कामजीवन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कामजीवन हा विषय स्त्रीपुरुषांमधल्या प्रणय आणि शरीरसंबंधाचा मागोवा घेतो. दत्तकाच्या कामशास्त्रातील एका नियमाप्रमाणे, दोन डोळ्याचा अनुराग आणि संवाद याचा अंतिम शेवट हा तिसऱ्यानेत्राच्या छेदनात व्हावा तर वात्स्यायन मात्र परत शरीरालाच महत्त्व देत असतो. आधुनिक फ्रॉइड मात्र शरीराच्या या मूळ गरजेला मनाच्या कोठल्यातरी आजाराचा भाग आणि प्रतिक्रिया समजत असतो. कंडोम ह्या प्राचीन भारतीय ग्रंथामधे कामजीवनासंबंधित सरळ मार्गदर्शन आहे. ते मार्गदर्शन काही बाबतीत अडाणीपणाचे असले तरी तो प्राचीन काळ लक्षात घेता आश्चर्याचे आहे. नंदिकेश्वर, दत्तकाचार्य, चरयन, सुवर्णनामा घोटकमुख, गोनार्दीय, गोणिकपुत्र, आणि कुचुमार ह्या मंडळींनी भर घालत नेलेल्या "कामसूत्रा"त वात्सायनाने शेवटची भर घालून सध्या उपलब्ध असलेले "कामसूत्र" तयार केले.

भारताची लोकसंख्या एव्हाना १२० कोटीहून अधिक झाली आहे; पण परिवारनियोजन (आणि विषाणूंनी निर्माण होणारे गंभीर आजार) ह्यांबद्दल पुरेशा चर्चेचा भारतीय समाजात अजून अभाव आहे. विशेषतः विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात स्त्रियांची सर्वांगीण उन्नती घडवून आणण्याकरता अज्ञ समाजाचा प्रचंड रोष पत्करून आयुष्य वेचणाऱ्या महर्षि धोंडो केशव कर्वेंचे रघुनाथ नावाचे जे ज्येष्ठ चिरंजीव होते त्यांनी आश्चर्यकारक दूरदॄष्टी दाखवून परिवारनियोजनाबद्दल मुख्यतः मराठी समाजाला माहिती पुरवण्याकरता १९२१ साली मुंबईत गिरगावमधे एक संस्था उघडली आणि १९२७ साली "समाजस्वास्थ्य" नावाचे एक मासिक चालू केले. १९५३ साली झालेल्या त्यांच्या निधनापर्यंत ते मासिक रघुनाथराव कर्वे प्रसिद्ध करत असत. नवीन काळात विशेषतः डॉ.विठ्ठल प्रभू ह्यांनी "निरामय कामजीवन" नावाच्या आपल्या पुस्तकाद्वारे लैंगिक शिक्षणाबद्दलचे समाजातले गैरसमज दूर करायला हातभार लावला आहे.

मानवी लैंगिक जीवन हे शारीरिक सानिध्य आणि लैंगिक आकर्षणने अभिव्यक्त होते. मानवी लैंगिक जीवन विविध मानसिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, आचार विचारांनी प्रभावित होत आले आहे. मानवी ज्ञानात तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, आरोग्य, जाणीवा नीती , मूल्य , योग्य- अयोग्य, पाप- पुण्य यांचाही प्रभाव लैंगिक अभिव्यक्तीवर पडत असतो.

संपूर्ण मानवी इतिहासात विविध वेळी विविध कला,साहित्य,सांस्कृतिकक्षेत्रात तत्कालीन समाजाच्या लैंगिकतेसंदर्भातील आचार विचारांची नोंद प्रामुख्याने घेतलेली आढळते. विविध काळात विविध समाजात तत्कालीन कायदे व सामाजिक नियम व्यक्तीतील नाते आणि लैंगिक संबंधावर प्रभाव ठेवून असतात. लैंगिकतेकडे बघण्याची दृष्टी विविध काळात विविध संस्कृतीत सतत बदलत आली आहे.

अलीकडच्या काळात लैंगिकतेसंदर्भात माहिती देणारी पुस्तके, वेब साईट्स, सामाजिक व शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →