काकवी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

उसाच्या रसापासून गूळ बनवताना जो पाक तयार होतो, त्याला काकवी असे म्हणतात. थोडक्यात हा द्रव रूपातील गूळ होय. याला हिंदीत शिरा, तर इंग्रजीत molases किंवा liquid jaggery असे म्हणतात. यातील साखरेचे प्रमाण, काढण्याची पद्धत आणि वनस्पतीच्या वयानुसार काकवी बदलतो. उसाच्या काकवीचा वापर प्रामुख्याने पदार्थ गोड करण्यासाठी आणि चवीसाठी केला जातो.

गुऱ्हाळात तयार झालेली काकवी सामान्य तापमानाला बाटलीत एक वर्षापर्यंत साठवून ठेवता येते. साखरेला उत्तम पर्याय म्हणून काकवी वापरली जाते. आयुर्वेदानुसार काकवी पचायला हलकी असते. हिच्या सेवनाने शरीर आणि हाडे मजबूत होतात. विशेष करून अति शारीरिक श्रम करणाऱ्याला काकवी उपयुक्त ठरते. हिच्या सेवनाने रक्त शुद्ध होते, तसेच रक्तातील लोहाची कमतरता देखील भरून निघते. काविळीच्या आजारात काकवी उपयुक्त मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →