कांदे पोहे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कांदे पोहे

कांदे पोहे, बटाटेपोहे हा मराठी खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :



जाड पोहे

चिरलेले कांद्याचे काप

चिरलेल्या हिरव्या मिरच्या

हळद

मोहरी/जिरे

तेल (गोडेतेल)

मीठ

शेंगदाणे

पूर्व तयारी :

पोहे क‍रण्या अगोद‍र पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.

१} जाड पोहे

२} पातळ पोहे

पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}कमी मारावा लागतो.

कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे. तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परता.

सजावट :

खायला देताना कोथिंबिर व खोबऱ्याचा कीस टाकुन द्यावे. आणि त्यावर मिरचीचे बारीक काप टाकुन घ्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →