कसूर (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कसूर हा २००१ चा भारतीय हिंदी भाषेतील कायदेशीर थरारपट आहे जो विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्सतर्फे निर्मित आहे. यात आफताब शिवदासानी आणि लिसा रे आहे व रे यांच्या पहिला हिंदी चित्रपट आहे. रे यांचा आवाज दिव्या दत्ता यांनी डब केला होता, तर शिवदासानींचा आवाज विक्रम भट्ट यांनी डब केला होता. अपूर्व अग्निहोत्री, इरफान खान आणि आशुतोष राणा हे सहाय्यक भूमिकेत आहेत.

हा चित्रपट २ फेब्रुवारी २००१ रोजी प्रदर्शित झाला, आणि त्याला समीक्षक आणि व्यावसायिक यश मिळाले होते. नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांसाठी तो उल्लेखनीय आहे.

हा चित्रपट १९८५ च्या अमेरिकन चित्रपट जॅग्ड एज चा अनधिकृत रिमेक आहे, व शेवट हा २००० च्या अमेरिकन भयपट व्हॉट लाईज बिनेथ मधून घेतला आहे, ज्याचे २००२ मध्ये भट्ट यांनी राझ या चित्रपटात रूपांतरण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →