आवारा पागल दीवाना हा २००२ मध्ये प्रदर्शित झालेला विक्रम भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन हास्य चित्रपट आहे. समीरच्या गीतांसह अनू मलिक यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे. हा चित्रपट २००० च्या अमेरिकन चित्रपट द होल नाइन यार्ड्स वर आधारित आहे. द मॅट्रिक्स आणि हाँगकाँग अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करणारे डिओन लाम हे ह्या चित्रपटाचे स्टंट दिग्दर्शक होते. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, परेश रावल, जॉनी लिव्हर, प्रीती झंगियानी, आरती छाब्रिया, अमृता अरोरा आणि राहुल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आवारा पागल दिवाना हा चित्रपट २० जून २००२ रोजी जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला. समीक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. हा चित्रपट भव्य आणि आकर्षक गाण्यांच्या दृश्यांसाठी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या अॅक्शन दृश्यांसाठी आणि परेश रावळ आणि जॉनी लीवर यांच्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध झाला.
आवारा पागल दिवाना
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?