कलाबेन डेलकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

कलाबेन मोहनभाई डेलकर (२१ ऑगस्ट, १९७१:सुखला, वलसाड जिल्हा, गुजरात - ) या भारतीय राजकारणी आणि दादरा आणि नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. दादरा आणि नगर हवेलीच्या त्या पहिल्या महिला खासदार तसेच महाराष्ट्राबाहेरील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पण पहिल्या खासदार आहेत.

तिचा विवाह सातवेळा खासदार असलेल्या मोहनभाई सानजीभाई डेलकर यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सदस्या म्हणून २०२१ ची पोटनिवडणूक यशस्वीपणे लढवली. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महेश गावित यांच्यावर ५१,२७० मतांनी विजय मिळवला.

मार्च २०२४ मध्ये, डेलकर यांना २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नाव देण्यात आले व त्या विजयी ठरल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →