कर्मान किंवा कार्मेनिया (फारसी: استان کرمان;ओस्तान ए केर्मान) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या आग्नेय भागात स्थित असलेला हा प्रांत आकाराने इराणमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून कर्मान ह्याच नावाचे शहर येथील राजधानीचे शहर आहे.
बाफ्त, बरदसीर, बाम, जिरोफ्त, जौपर, राफसंजान, झरांद, सिरजान, शहर ए बाबक, केर्मान, महान, रायेन, कहनुज, घलेगंज, मनुजान, रूडबार ए जोनोब, अनबार आबाद आणि रावार ही कर्मान प्रांतातील काही मोठी शहरे आहेत.
प्राचीनकाळात हा भाग कार्मेनिया या नावाने ओळखला जायचा. येथील भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असून आजवर येथे अनेक मोठे भूकंप झाले आहेत.
कर्मान प्रांत
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.