कर्नाटक विधानसभा (कन्नड: ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನ ಸಭೆ) हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: कर्नाटक विधान परिषद). २२५ आमदारसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचे कामकाज बंगळूरमधून चालते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे के.बी. कोळीवाड विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे विधानसभेचे नेते आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे कर्नाटक विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ११३ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान कर्नाटक विधानसभा २०१३ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.
कर्नाटक विधानसभा
या विषयातील रहस्ये उलगडा.