आगाशिव लेणी किंवा जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या सभोवती असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासासाठी खोदलेली दिसतात. पावसाळ्यात चार महिन्यात एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर राहणे याला वर्षावास (पाली वस्सावात) म्हणतात. ही लेणी पावसाळ्यातील विश्रांतीसाठी खोदलेली आहेत. कराडपासून २ किमी अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी अगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांस 'अगाशिवची लेणी' असेही म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कराड लेणी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.