कमान हे एक एखाद्या जागेच्या विस्तारासाठी करण्यात आलेले वक्राकार बांधकाम असते. त्याचे काम, त्यावरच्या वजनाचा भार सहन करणे अथवा न-करणे या दोन्ही प्रकारे राहू शकते.त्याला एक प्रकारचा dhyuw7iwuiaunwhhaट म्हणता येउ शकते किंवा घुमटाचा तो समानार्थी शब्द आहे,पण घुमट ही एक प्रकारची 'अखंड कमान' असा त्यात फरक करण्यात येतो.याचे बांधकाम मेसोपोटेमिया मध्ये ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात आढळले. ते विटांनी केलेले होते. त्याचा पद्धतशीर वापर रोमन लोकांनी सुरू केला. त्यांनी या पद्धतीचा बांधकामात मुक्तपणे वापर केला.
कमान हा एक शुद्ध दाबाचा प्रकार आहे. त्यायोगे, त्यावरील असलेला भार हा जमिनीकडे बदली करण्यात यश मिळते.तसेच या बांधकामाद्वारे त्यामधील जागा मोकळी मिळते. तसेच या वास्तूचे सौंदर्यही वाढते. याचे कार्य बलाचे रूपांतर दाबात्मक-ताण व खेच-ताण यात करून त्या बांधकामास स्थिर करणे असे असते. याची प्रवृत्ती ही नेहमीच, त्याचे दोन्ही आधार-बिंदूच्या बाहेर फाकण्याची राहते. कमानीची उंची कमी केली तर ही फाकण्याची प्रवृत्ती वाढते. त्याचे बांधकाम कोसळू नये म्हणून, त्यास आतील बाजूस आवश्यक असे अंतर्गत बंधक देऊन अथवा, बाह्य बाजूस भरीव बांधकाम करून ते टाळता येते.
कमान
या विषयावर तज्ञ बना.