कथा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. 'एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा' अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश, खंड ३ मध्ये करण्यात आली आहे. तसेच 'कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटविणारी हकिकत म्हणजे लघुकथा होय' अशी व्याख्या ना. सी. फडके यांनी केली आहे. इंदुमती शेवडे यांनी 'एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण् संघटना म्हणजे कथा' अशी व्याख्या केली आहे. तर वा. ना. देशपांडे यांनी ' कुशल चित्रकार कुंचल्याच्या चार दोन फटक्यात संपूर्ण चित्र तयार करतो, तसेच या लघुकथा प्रकाराचेही आहे' अशी व्याख्या केली आहे. लघुकथा या मानवी जीवन आणि सामाजिक स्थिति यांची सांगड घालून मानवी मूल्यांना स्पष्ट करण्याचे काम करतात. उदा. आनंद यादवांची 'पाटी आणि पोळी' व बाबूराव बागलांची 'सूड' ह्या कथा तत्कालीन समाजाच्या सामाजिक मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात.

प्रसिद्ध कथालेखक :



आनंद यादव

आशा बगे

कमल देसाई

गौरी देशपांडे

पु. भा. भावे

पु.ल.देशपांडे

प्रकाश संत

प्रिया तेंडुलकर

भास्कर चंदनशिव

माधव शिरवळकर

मिलिंद बोकील

मेघना पेठे

रणजित देसाई

रा.रं. बोराडे

व. पु. काळे

विजया राजाध्यक्ष

शंकर पाटील

शिवाजी सावंत

सरदार जाधव

सानिया

सुनीता देशपांडे

सुमति क्षेत्रमाडे

सुहास शिरवळकर

भास्कर चंदनशिव

बाबुराव बागुल

जी.ए.कुलकर्णी

निलेश बामणे

मोनिका गजेंद्रगडकर

नीरजा

भारत सासणे

सदानंद देशमुख

उषाकिरण आत्राम

राजेंद्र मलोसे

अभिराम भडकमकर

संजय कळमकर

सचिन पाटील

राजन खान

दिलीप धोंडगे

राजन गवस

आनंदीबाई शिर्के

रघुनाथ केंगार

काशीबाई कानिटकर

सानिया

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

अनिल सपकाळ

अमिताभ

जी के ऐनापुरे

दिनानाथ मनोहर

दिवाकर कृष्ण

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →