एखाद्या पदार्थाची (जसे की कणांच्या स्वरूपातील घनपदार्थ किंवा पावडर) कण घनता म्हणजे तो पदार्ध ज्या कणांनी बनलेली असते, त्या कणांची निव्वळ वस्तुमान घनता होय. कण घनता ही स्थूल घनतेपेक्षा वेगळी असते; कारण स्थूल घनतेमध्ये विशिष्ट माध्यमात (सामान्यतः हवेमध्ये) पावडरच्या मोठ्या आकारमानाची सरासरी घनता मोजली जाते.
कण घनता हे तुलनेने सुस्पष्ट आणि निश्चित मूल्य असते, कारण ते घनपदार्थाच्या संकुचिततेच्या किंवा दाबण्याच्या प्रमाणावर अवलंबून नसते. याउलट, स्थूल घनतेची मूल्ये पावडर मुक्त स्थितीत साचलेली आहे की ती दाबून/ठोकून संकुचित केलेली आहे यानुसार बदलतात.
कण घनता
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.