कंबोडियाचे पंतप्रधान हे कंबोडियाचे सरकार प्रमुख आहेत. पंतप्रधान मंत्रिमंडळाचे अध्यक्ष देखील असतात आणि कंबोडियाच्या रॉयल सरकारच्या कार्यकारी शाखेचे नेतृत्व करतात. पंतप्रधान हे संसदेचे सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती राजाकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. १९४५ पासून (कंबोडियाच्या स्वातंत्रापासून), ३७ व्यक्तींनी पंतप्रधान म्हणून काम केले आहे; ३३ अधिकृत पंतप्रधान म्हणून आणि ४ कार्यवाहक म्हणून . २०२३ पासून सध्याचे पंतप्रधान हुन मानेट आहेत.
पीस पॅलेस हे पंतप्रधानांचे प्रमुख कार्यस्थळ आहे. त्याचे उद्घाटन १९ ऑक्टोबर २०१० रोजी राजाच्या हस्ते झाले. मात्र, पंतप्रधान त्यांच्या खासगी निवासस्थानी राहतात.
कंबोडियाचे पंतप्रधान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.