ओम पुरी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ओम पुरी

ओम प्रकाश पुरी (जन्म : अंबाला, १८ ऑक्टोबर १९५०; - मुंबई, ६ जानेवारी २०१७) हे एक भारतीय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना १९९० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ओम पुरी यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९७६ साली घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटाने झाली. अर्ध सत्य (१९८२) या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेर पुरस्कार, एक जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहेत. ओम पुरी यांनी सुमारे ३०० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

पुरी यांचा अंधेरी मुंबई येथे राहत्या घरी वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →