ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९४८ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंडचा हा प्रथम दौरा होता. इना लामासनने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व मॉली डाइव्हकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले.
एकमेव महिला कसोटी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व मैदानावर खेळविण्यात आली ज्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी दुबळ्या न्यू झीलंड संघावर १ डाव आणि १०२ धावांनी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४७-४८
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.