एलिफंट धबधबा हा भारताच्या मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील शिलाँग जवळ असलेला एक निसर्गरम्य धबधबा आहे. हा धबधबा शिलाँग शहरापासून साधारणपणे १२ किलोमीटर अंतरावर वसलेला असून मेघालयातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे.
या धबधब्याला स्थानिक खासी भाषेत का क्षैद लाई पातेंग खोहसिएव' (तीन टप्प्यांचा धबधबा) असे म्हणतात. ब्रिटिश काळात या धबधब्याजवळ हत्तीच्या आकाराचा एक मोठा खडक होता, ज्यावरून ब्रिटिशांनी याचे नाव एलिफंट धबधबा असे ठेवले. १८९७ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात हा खडक नष्ट झाला असला तरी हे नाव आजही कायम आहे.
एलिफंट धबधबा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.