एलओसी कारगिल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

एलओसी कारगिल हा २००३ चा भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक युद्ध चित्रपट आहे जो भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धावर आधारित आहे. हा जे.पी. दत्ता यांनी त्यांच्या "जेपी फिल्म्स" बॅनरखाली निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात बॉलीवूड मधील अनेक अभिनेते आहे आणि आदेश श्रीवास्तव आणि अनु मलिक यांनी संगीत दिले आहे.

हा चित्रपट भारतीय सैन्याच्या यशस्वी ऑपरेशन विजयवर आधारित आहे जो मे १९९९ मध्ये पाकिस्तानी घुसखोरी आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) भारतीय बाजूने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी कारगिल सेक्टरमधील मोक्याच्या उंचीवर कब्जा केल्यानंतर सुरू करण्यात आला होता. प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. २५५ मिनिटे चालणारा हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे आणि ह्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →