एल लाब्रादोर मेट्रो स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एल लाब्रादोर मेट्रो स्थानक

एल लाब्रादोर हे कितो मेट्रो मधील एक स्थानक आहे. २१ डिसेंबर २०२२ रोजी कितुंबे आणि एल लाब्रादोर दरम्यानच्या मार्गाच्या उद्घाटन झाल्यावर हे स्थानक अधिकृतपणे उघडण्यात आले. महसूल सेवा २ मे २०२३ रोजी सुरू झाली आणि ११ मे २०२३ रोजी बंद झाली. ही सेवा १ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुरू झाली. हे स्थानक हिपीहापा स्थानकाच्या नंतरचे अंत्यस्थानक आहे.

हे स्थानक भूतळापासून ९ मीटर खाली भूमिगत आहे.

हे स्थानक, याच नावाच्या वाहतूक अंत्यस्थानकाच्या शेजारी, काय्ये आयझॅक अल्बेनिझ येथे आहे. मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार येथील बस आणि ट्रॉलीबस स्थानकाच्या प्रवेशद्वारांशी एकत्रित केले आहे. हे कितो मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील अशा पाच संकलित स्थानकांपैकी एक आहे. यात अपंग प्रवाशांसाठी समर्पित प्रवेश आहे.

मार्गाची चाचणी सुरू असतांना, ३० ऑक्टोबर २०२० रोजी पहिली गाडी या स्थानकावर आली. २३ जानेवारी २०२३ रोजी ६०० आमंत्रित प्रवाशांसह पहिली गाडी या स्थानकावर आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →