एम.ओ.एच. फारूक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एम.ओ.एच. फारूक

एम.ओ. हसन फारूक मरिकार (तामिळ: எம்.ஓ.எச் ஃபரூக் மரைக்காயர், मल्याळम: എം.ഒ. ഹസൻ ഫാറൂഖ് മരിക്കാർ; ६ सप्टेंबर १९३७ - २६ जानेवारी २०१२) हे भारत देशातील केरळ व झारखंड राज्यांचे माजी राज्यपाल, लोकसभा सदस्य व तीन वेळा पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते.

१९६७ साली पुडुचेरीच्या मुख्यमंत्रीपदावर आलेले फारूक तेथील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. १९६७-१९६८, १९६९-१९७४ व १९८५-१९८९ ह्या तीन वेळा ते ह्या पदावर होते. १९९१, १९९६ व १९९९ साली ते पुडुचेरीमधून लोकसभेवर निवडून आले होते.

केरळच्या राज्यपालपदावर असताना २६ जानेवारी २०१२ रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →