एम.आर. श्रीनिवासन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एम.आर. श्रीनिवासन

मालूर रामस्वामी श्रीनिवासन (५ जानेवारी १९३० - २० मे २०२५), हे एक भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि यांत्रिक अभियंता होते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात आणि 'दाबित जड पाणी अणुभट्टी' (प्रेशराइज्ड हेवी-वॉटर रिॲक्टर) च्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकार तर्फे २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीनिवासन यांचा जन्म १९३० मध्ये बंगळुरू येथे झाला. त्यांच्या एकूण आठ भावंडांपैकी ते तिसऱ्या क्रमांकाचे होते. त्यांनी म्हैसूरच्या इंटरमिजिएट कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय अभ्यासक्रमात त्यांनी भाषा विषयात संस्कृत आणि इंग्रजी भाषा निवडली होती. भौतिकशास्त्र हे त्यांचे पहिले प्रेम असूनही, ते मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या नव्याने सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (सध्याचे विश्वेश्वरय्या विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय) प्रवेश घेतला. त्यांनी १९५० साली यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि १९५४ मध्ये कॅनडातील माँत्रिऑल येथील मॅकगिल विद्यापीठातून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी देण्यात आली. त्यांचे विशेषज्ञता क्षेत्र गॅस टर्बाइन तंत्रज्ञान होते.

श्रीनिवासन यांचे २० मे २०२५ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →