एचएमएस बुलडॉग (एच९१)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एचएसएस बुलडॉग (एच९१) ही रॉयल नेव्हीची विनाशिका होती. ही नौका १९३१मध्ये सेवारत झाली व हिला सुरुवातीला भूमध्यसागरी ताफ्यात नियुक्त केले गेले, १९३६मध्ये बुलडॉग होम फ्लीटमध्ये शामिल झाली. या नौके ने १९३६-१९३९ च्या स्पॅनिश यादवी युद्धादरम्यान, युद्धाच्या दोन्ही बाजूंनी ब्रिटन आणि फ्रान्सने लादलेल्या नाकेबंदीची अंमलबजावणी केली. बुलडॉगने दुसऱ्या महायुद्धात अटलांटिकच्या लढाईत आणि आर्क्टिक समुद्रात व्यापारी नौकांच्या काफिल्यांना सोबत केली. या युद्धादरम्यान १९४१मध्ये जर्मन पाणबुडीतून एनिग्मा यंत्र आणि ते वापरण्याचे तंत्र हस्तगत करणे ही तिची सर्वात उल्लेखनीय कृती होती. १९४४ मध्ये बुलडॉगने अजून एक जर्मन पाणबुडी बुडवली होती. ९ मे १९४५ रोजी चॅनेल आयलंड्सवर जर्मन सैन्यदलाने बुलडॉगवर आत्मसमर्पण केले. युद्धानंतर १९४६ मध्ये ती भंगारात मोडली गेली .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →