उर्मिला हे रामायणातील एक पात्र आहे. ती सीतेची धाकटी बहीण आणि लक्ष्मणाची पत्नी होती. लक्ष्मणाचे जसे त्याचा भाऊ रामावर प्रचंड प्रेम होते, तसेच उर्मिला सीतेला समर्पित होती. हिंदू पुराणातील महान स्रियांमध्ये तिची गणना होते आणि सर्वश्रेष्ठ पतिव्रतांमध्येही तिचा समावेश होतो.
लक्ष्मणाने चौदा वर्षांचा वनवास न झोपता व्यतित केला. पण ते ऊर्मिलामुळे शक्य झाले. कारण ती रात्री स्वतःसाठी व दिवसा लक्ष्मणासाठी झोप घ्यायची. अशाप्रकारे चौदा वर्षे तिने झोपून व्यतित केली. उर्मिला या अतुलनीय त्यागासाठी प्रसिद्ध आहे.
जेव्हा लक्ष्मण तिला वनवासाला जाण्याचा निर्णय कळवायला आला तेव्हा तिने मुद्दाम राणीचा पोशाख घातला. हे पाहून लक्ष्मण तिच्यावर भडकला आणि तिची तुलना कैकेयीशी केली. पतीचे लक्ष तिच्यापासून विचलित करण्यासाठी तिने हे मुद्दाम केले जेणेकरून तो तिची बहीण आणि भावाची काळजी घेऊ शकेल. हे सगळे समजल्यावर सीता म्हणाली की, उर्मिलाच्या त्यागाची बरोबरी १०० सीताही करू शकणार नाहीत.
ऊर्मिला
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?