उम्स्वाती तिसरा (स्वाती: Mswati III; १९ एप्रिल १९६८) हा दक्षिण आफ्रिका भागातील इस्वाटिनी देशाचा राजा व इस्वाटिनी शाही परिवाराचा कुटुंबप्रमुख आहे. इस्वाटिनीच्या संविधानाने राजाला राज्यकारभाराचे सर्व अधिकार दिले असून पंतप्रधान व मंत्रिमंडळाची निवड उम्स्वाती करतो. सर्व राज्यहक्क असलेला तो आफ्रिका खंडामधील अखेरचा विद्यमान राजा आहे.
मस्वाती यांचे वडील राजे सोभुजा यांना तब्बल १२५ बायका होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मस्वाती यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा सुरू ठेवली आहे. अवघ्या ४७ वर्षांच्या मस्वातींनी आतापर्यंत १५ लग्नं केली आहेत. २०१३ मध्ये त्यांनी १८ वर्षांच्या मुलीसोबत १५वा विवाह केला आहे. यांना किमान १५ राण्या व ३० मुले आहेत. आपल्या राण्यांसाठी त्यांनी १३ अलिशान महाल बांधले आहेत.
२००९ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार, मस्वाती हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत. त्यांच्याकडं ६२ अलिशान गाड्यांचा ताफा असून त्यात पाच लाख डॉलरच्या मेबेक कारचाही समावेश आहे. या गाड्यांचे फोटो काढण्यास बंदी आहे.
इस्वाटिनीची जनता दारिद्र्यामध्ये जीवन कंठत असताना उम्स्वातीकडे मात्र प्रचंड प्रमाणावर संपत्ती असून त्याचे राहणीमान आलिशान व उधळ्या स्वरूपाचे आहे. २०१४ सालच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये संसदेने उम्स्वाती परिवाराच्या खर्चासाठी प्रतिवर्ष ६१ दशलक्ष अमेरिकन डॉलरची तरतूद केली. उम्स्वातीने स्वाझीलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याची वृत्ते देखील प्रकाशित झाली आहेत.
उम्स्वाती तिसरा
या विषयावर तज्ञ बना.