उबुंटू अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणाऱ्या आवृत्त्या अशी उबुंटूची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे ठिय्या वातावरण वापरले गेले आहे. याशिवाय के डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत.
उबुंटुचे नामकरण हे दक्षिण आफ्रिकेतील एका कल्पनेवरून करण्यात आले आहे. "इतरांप्रती मानवता" असे ह्या कल्पनेचे ढोबळ वर्णन करता येईल. "आपण आहोत ते इतरांमुळे आहोत" अथवा "आपण सगळे जसे आहोत तसाच मी आहे." अशीही ह्या कल्पनेची काही विवेचने सुचवण्यात आली आहेत.
उबुंटू
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?