उदय भ्रेंब्रे (२७ डिसें १९३९). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कोकणी लेखक. नाटककार आणि संपादक म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. खरेतर गोव्यातील प्रसिद्ध वकील अशी एक दुसरीही त्यांची ओळख आहे. जन्म दक्षिण गोव्यातील रिव्हॉन येथे. त्यांचे कुटुंब हे जमीनदार होते.त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जांबावली, रिवण, कुचकडे आणि वास्को येथून झाले. त्याचे हे शिक्षण पोर्तुगीज भाषेतून झाले.
गोवामुक्ती आंदोलनात त्यांच्या वडीलांना अटक झाली होती आणि त्यांना १९६२ पर्यंत पोर्तुगालला अटक करून ठेवण्यात आले होते. कुटूंब स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचा शिक्षणक्रम चालू झाला. शालेय वयातच त्यांना लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाची आवड होती. शालेय अभ्यासक्रम आटोपून पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिक्षण घेत असूनही कला शाखेची त्यांची ओढ कायम होती. त्यावेळी विद्या नावाचे महाविद्यालयाचे वार्षिक निघत असे, त्यातील एकाचे संपादन भ्रेंब्रे यांनी केले होते.
उदय भेंब्रे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.