उ थांट

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उ थांट

उ थांट (बर्मी: ဦးသန့်; ; २२ जानेवारी १९०९ - २५ नोव्हेंबर १९७४) हा एक बर्मी राजकारणी व संयुक्त राष्ट्रांचा तिसरा सरचिटणीस होता. तो सरचिटणीस पदावर १९६१ ते १९७१ दरम्यान होता.

बर्माचा पहिला पंतप्रधान उ नुचा जवळचा मित्र असलेला थांट नुच्या मंत्रीमंडळामध्ये विविध खात्यांवर राहिला होता. १९६१ साली दाग हामारहोएल्डच्या अपघाती मृत्यूनंतर थांटची सरचिटणीसपदावर नियुक्ती झाली. थांटने १९६२ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी व सोव्हिएत अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह ह्यांच्या दरम्यान सलोखा घडवून आणण्याचे व क्युबामधील युद्धसदृष परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न केले. व्हियेतनाम युद्धामधील अमेरिकेच्या भूमिकेवर थांटने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →