ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो. पण दुनियेची निर्मितीनंतर मानवाच्या अस्तीत्वापासून जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा, विष्णू व शिव या तीन देवता आहेत, जे विश्वाचे प्रमुख उर्जा स्रोत आहेत. यातील ब्रम्हा हे निर्माते आहेत, त्यांनी ब्रम्हांडाची निर्मिती केली; शिव/महेष हे जीवन आहेत, ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत; विष्णू हे कर्ता आहेत, ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात.
या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत. यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही. या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील.
मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे, जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करते. यातील बहुतांश अवतार हे सनातन हिंदू धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत. तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते विश्वाचा प्रमूख धर्म असणाऱ्या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत.
हिब्रू बायबलमध्ये "आय अॅम दॅट आय अॅम" आणि वायएचव्हीएच ही चार मुळाक्षरे (टेट्राग्रामॅटन) ईश्वराची नावे म्हणून वापरलेली आहेत; तर ख्रिश्चन धर्मात याहवेह व जेहोवा ही वायएचव्हीएचची नादरूपे म्हणून वापरलेली आढळतात. अरबी भाषेत अल्ला हे नाव वापरले जाते आणि अरबी भाषिकांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने "अल्ला" या नावासोबत इस्लामी श्रद्धा आणि संस्कृतीचे निर्देश येतात. इस्लाममध्ये ईश्वरासाठी अनेक नावे आहेत, तर यहुदी धर्मात इलोहिम व अडोनाई या मुख्य नावांनी ईश्वराला ओळखले जाते.
अतिनैसर्गिक निर्माता आणि मानवजात व विश्वाचा नियंत्रक म्हणून ईश्वराला संकल्पित केले जाते. ईश्वरवाद्यांनी ईश्वराच्या विविध संकल्पनांना विविध गुण आरोपिलेले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने सर्वज्ञता (अमर्याद ज्ञान), सर्वशक्तिमानता (अमर्याद सामर्थ्य), सर्वव्यापकता (सर्वत्र असणे), सर्वकल्याणदृष्टी (परिपूर्ण चांगुलपणा), दैवी सरलता आणि शाश्वत व आवश्यक अस्तित्त्व यांचा समावेश होतो.
ईश्वर अमूर्त (द्रव्याने न बनलेला), वैयक्तिक अस्तित्त्व, समग्र नैतिक बंधनांचा स्रोत आणि "ज्याची कल्पना केली जाऊ असते असे सर्वश्रेष्ठ अस्तित्त्व" याही मार्गांनी संकल्पित केला गेलेला आहे. प्रारंभीच्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ईश्वरवादी तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर या गुणारोपांचे समर्थन केले. अनेक उल्लेखनीय मध्ययुगीन आणि आधुनिक तत्त्वज्ञांनी ईश्वरास्तित्वाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात युक्तिवाद केले आहेत. सिस्टाईन चॅपेलमधील मायकेलेंजेलोने बनविलेले भित्तिलेपचित्र : पाश्चात्य कलेतील 'पिता' ईश्वराचे उत्कृष्ट उदाहरण जातो.
इतर धर्मांमध्येही ईश्वरासाठी नावे आहेत : नमुन्यादाखल बहाई पंथात बहा, शीख धर्मात वाहेगुरू आणि झरतुष्ट्रमतात अहुर मज्द.
अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलमध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हणले आहे.
ईश्वर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.