ईशान्य विभागीय परिषद ही ईशान्य विभागीय परिषद कायदा १९७१ च्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक सल्लागार संस्था आहे आणि ही परिषद ७ नोव्हेंबर १९७२ रोजी शिलाँग येथे अस्तित्वात आली. ईशान्य भारताची आठ राज्ये उदा. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम हे या परिषदेचे सदस्य आहेत, त्यांचे संबंधित मुख्यमंत्री आणि राज्यपाल त्यांचे प्रतिनिधित्व करतात. २००२ साली सिक्किमची परिषदेत भर पडली. परिषदेचे मुख्यालय शिलाँग येथे असून भारत सरकारच्या पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईशान्य परिषद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.