ईदी अमीन (१९२५ - १६ ऑगस्ट २००३) हा मध्य अफ्रिकेतील युगांडा देशाचा लष्करी हुकूमशाह व तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ह्याचा कार्यकाल १९७१ ते १९७९ इतका राहिला. ईदी अमीन यांची कारकीर्द ब्रिटिश सैन्यात १९४६ मध्ये भरती झाल्यापासून झाली व स्वातंत्र्यानंतर त्यांची बढती मेजर जनरल या पदापर्यंत झाली, १९७१ मध्ये त्याने मिल्टन ओबोटे यांचे सरकार उलथवून टाकत सत्ता हातात घेतली. ईदी अमीनचा राज्यकाल अनेक वाईट कारणांसाठी कायमचा लक्षात राहिला. मानवी मूल्यांची तुडवणूक,राजकीय बंदी, अनेक विवादास्पद राजकीय हत्या व भारतीयांची युगांडातून हकालपट्टी हे ह्यांमधील प्रमुख विषय होते. अमीनच्या कार्यकालात अंदाजे ५ लाख लोकांची हत्या करण्यात आली. लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड हा चित्रपट ईदी अमीन यांच्यावर आधारित आहे. फॉरेस्ट व्हिटेकर ह्याने ईदी अमीनची भूमिका केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईदी अमीन
या विषयावर तज्ञ बना.