इम्रान खान

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

इम्रान खान

इम्रान अहमद खान नियाझी (जन्म :५ ऑक्टोबर, १९५२) हे एक पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडू आणि राजकारणी आहेत, ज्यांनी ऑगस्ट २०१८ ते एप्रिल २०२२ पर्यंत पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून काम केले. ते पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

लाहोर, पाकिस्तान मधील नियाझी पश्तून कुटुंबात जन्मलेल्या खानने केबल कॉलेज, ऑक्सफर्डमधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात १९७१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून केली. खान १९९२ पर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघातर्फे खेळत होता. इ.स. १९८२ ते १९९२ दरम्यान अधूनमधून ते क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून निवडल्या गेले होते. इ.स. १९९२ चा क्रिकेट विश्वचषक त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जिंकला होता. क्रिकेटच्या प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाणारे, खान नंतर आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये सामील झाले. १९९६ मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ची स्थापना करून, खान यांनी एक जागा जिंकली. २००२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नॅशनल असेंब्ली, मियांवली येथून विरोधी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पक्षाने ने २००८ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला आणि २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकप्रिय मतांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफ हा नॅशनल असेंब्लीमधील सर्वात मोठा पक्ष बनला आणि खान यांनी पंतप्रधान म्हणून अपक्षांसह युतीचे सरकार स्थापन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →