इनसाइड एज ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. करण अंशुमनने निर्माण केलेली ही मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर १० जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाली. ही ॲमेझॉन ओरिजिनल्सने वितरित केलेली ही पहिली हिंदी भाषेतील मालिका आहे.
ही मालिका मुंबई मॅव्हेरिक्स या काल्पनिक टी२० क्रिकेट संघावर आहे. या संघाचे मालक लीग-व्यापी स्पॉट-फिक्सिंग षडयंत्र चालवतात. या मालिकेत विवेक ओबेरॉय, रिचा चड्डा, सिद्धांत चतुर्वेदी, तनुज विरवानी, अंगद बेदी, सयानी गुप्ता, आमिर बशीर, आणि सपना पब्बी तसेच मनु ऋषी, अमित सियाल, करण ओबेरॉय आणि आशा सैनी यांनीही कामे केली आहेत.
इनसाईड एजला समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि ४६ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेसाठी नामांकन मिळाले. या मालिकेच्या दुसऱ्या मोसमाची सुरुवात ६ डिसेंबर, २०१९ रोजी झाली तर तिसऱ्या मोसमाची सुरुवात ३ डिसेंबर २०२१ रोजी झाली.
इनसाइड एज (दूरचित्रवाणी मालिका)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?