ऋग्वेदातील इंद्र ही हिंदू धर्मातली एक प्रमुख देवता आहे. ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते या देवतेला उद्देशून आहेत. हिंदू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे. इंद्राला सोमाबद्दल आसक्ती असल्याने त्याला सोमपा असे नाव आहे.
इंद्राणी ही इंद्रपत्नी असून ती सूक्तद्रष्टी आहे. इंद्राणीला अखण्ड सौभाग्यवतीपद पावलेले आहे. म्हणून लग्नात वाङ्निश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे.
इंद्राचे देऊळ मात्र कोठेही नाही. इंद्रालाच देवेंद्र, सुरेंद्र,अमरेंद्र, वज्रपाणि, सहस्राक्ष, वसावा, पुरंदर, शक्र, सोमपा, मेषवृषण अशा विविध नावांनी ओळखले जाते. इंद्र हा सुरांचा म्हणजेच देवांचा राजा म्हणून देवेंद्र किंवा सुरेंद्र म्हणतात. इंद्राच्या हाती वज्र हे दधिची ऋषींंच्या अस्थीपासून बनलेले शस्त्र असल्याकारणाने इंद्राला वज्रपाणि म्हणून ओळखले जाते, पाणि म्हणजे हात. तसेच इंद्राला सहस्र म्हणजे हजार अक्ष म्हणजे डोळे असल्यामुळे सहस्राक्ष सुद्धा म्हणतात.
इंद्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!