इंदुलता सुक्ला

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इंदुलता सुक्ला

इंदुलता एल. सुक्ला (७ मार्च १९४४ - ३० जून २०२२) या भारतीय अभ्यासिका होत्या. त्या संबलपूर विद्यापीठ, संबलपूर, ओडिशा येथे तीन दशकांहून अधिक काळ गणिताच्या प्राध्यापिका होत्या.

त्यांचे शालेय शिक्षण महाराणी प्रेम कुमारी कन्या शाळेत झाले. त्यांनी बी.एस्सी. एमपीसी कॉलेज, बारीपाडा मधून गणित ऑनर्ससह पुर्ण केली. त्यांनी एम.एस्सी. १९६६ मध्ये कटकच्या रेवेनशॉ कॉलेजमधून गणित विषयात पुर्ण केले. त्यानंतर एमपीसी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काही काळ काम केले. पीएच.डी.साठी सी एस आय आर फेलोशिपसह जबलपूर विद्यापीठात गेल्या. त्यांच्या संशोधनाचा पाठपुरावा करत असताना, त्यांनी संबलपूर विद्यापीठात नोव्हेंबर १९७० मध्ये स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये लेक्चरर म्हणून प्रवेश घेतला आणि मार्च २००४ मध्ये त्यांची सेवानिवृत्ती होईपर्यंत त्या तिथेच राहिल्या.

ती पाठ्यपुस्तक संख्या सिद्धांत आणि क्रिप्टोग्राफीचे अनुप्रयोग (कटक: कल्याणी पब्लिशर्स, २०००) च्या लेखिका आहेत. त्यांच्या संशोधनात त्यांनी इंग्लिश गणितज्ञ ब्रायन कटनर यांच्यासोबत फूरियर सिरीजवर काम केले. त्या अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी (ए एम एस) आणि इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी (आय एम एस) च्या आजीवन सदस्य होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →