इंदर राज आनंद

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

इंदर राज आनंद (मृत्यू ६ मार्च १९८७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संवाद आणि पटकथा लेखक होते. त्यांनी राज कपूरच्या अनेक चित्रपटांसाठी काम केले जसे आग (१९४८), आह (१९५३), अनारी (१९५९) आणि संगम (१९६३). औपचारिकपणे हिंदी चित्रपटांसाठी लेखक म्हणून संबोधले जात असले तरी, ते खरेतर उर्दू लेखक होते, व ते पटकथा आणि संवाद उर्दूमध्ये लिहित होते.

ते अभिनेता-दिग्दर्शक टिन्नू आनंद आणि निर्माता बिट्टू आनंद यांचे वडील होते. इंदरचा नातू प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (सलाम नमस्ते (२००५) आणि अंजाना अंजानी (२०१०) आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मुकुल आनंद हे इंदरचे पुतणे होते. अमिताभ बच्चन अभिनीत शहंशाह हा लेखक म्हणून इंदरचा शेवटचा चित्रपट होता. इंदरच्या मृत्यूनंतर शहंशाह प्रकाशित झाला आणि तो त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →