इंचॉन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इंचॉन

इंचॉन (कोरियन: 인천) हे दक्षिण कोरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल व बुसान खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या वायव्य भागात पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियामधील एक मोठे बंदर व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच शहरात स्थित आहे. २०१४ आशियाई खेळ इंचॉनमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान भरवले जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →