इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२२-२३

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२२-२३

इंग्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामने खेळण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. हे सामने पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग होते. डिसेंबर २०२० मध्ये इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान कोविड-१९ च्या उद्रेकामुळे हे सामन पुढे ढकलण्यात आले होते. पहिले दोन सामने ब्लूमफाँटेन येथे, आणि शेवटचा सामना किम्बर्ले येथे खेळवला गेला.

जेसन रॉयच्या शतकानंतरही इंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना २७ धावांनी गमावला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ७ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना २० षटकांत नाबाद १४६ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु त्यानंतर संघ सर्वबाद २७१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा तिसरा

सर्वोच्च यशस्वी पाठलाग केला, टेम्बा बावुमाच्या शतकाने त्यांनी इंग्लंडच्या ७ बाद ३४२ ही धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, जोस बटलर (१३१) आणि डेविड मलान (११८) यांनी चौथ्या विकेटसाठी २३२ धावांची भागीदारी केल्यामुळे इंग्लंडचा संघ ३ बाद १४ वरून सावरला आणि संघाचा वेग ७ बाद ३४६ धावांपर्यंत मजल मारू शकला; त्यानंतर जोफ्रा आर्चरने सहा गडी बाद करत घेत पाहुण्यांना ५९ धावांनी विजय मिळवून दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →