एर मार्शल आस्पी मेरवान इंजिनीयर डीएफसी (१५ डिसेंबर, १९१२ - १ मे, २००२) हे स्वतंत्र भारताचे दुसरे वायुसेना प्रमुख होते.
त्यांनी१९३० मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी सह-वैमानिक म्हणून त्यांचे मित्र आर.एन. चावला यांच्यासोबत ब्रिटिश भारतातील कराची येथून लंडनमधील क्रोयडन विमानतळावर उड्डाण केले. असे करणारे ते पहिले भारतीय होते. त्यानंतर लगेचच त्यांनी इंग्लंड आणि भारतादरम्यान एका महिन्याच्या कालावधीत एकट्याने (सोलो) विमान प्रवास करून आगा खान स्पर्धा जिंकली.
त्यानंतर इंजिनीयर भारतीय वायुसेनेत सामील झाले. त्यांनी आरएएफ क्रॅनवेल येथे प्रशिक्षण घेतले नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स आणि बर्मा येथे लष्करी कारवायांमध्ये भाग घेतला. यांतील दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस सन्मान दिला गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस ते विंग कमांडर झाले.
निवृत्तीनंतर त्यांनी भारताचे इराणमधील राजदूत म्हणून काम केले आणि नंतर काही काळ कॅलिफोर्नियामध्ये घालवला, त्यानंतर त्यांचे अंतिम दिवस मुंबईमध्ये गेले.
आस्पी इंजिनीयर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!