आशिया ऑलिंपिक समिती

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आशिया ऑलिंपिक समिती

आशिया ऑलिंपिक समिती ही आशिया खंडामधील खेळांचे प्रशासन करणारी एक संघटना आहे. १९८२ साली स्थापन झालेल्या ह्या समितीचे मुख्यालय कुवेतमधील कुवेत शहरात असून सध्या आशियामधील ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटना ह्याच्या सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे एक अंग असलेली आशिया ऑलिंपिक समिती दर ४ वर्षांनी आशियाई खेळ स्पर्धांचे आयोजन करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →